महाड (मिलिंद माने) कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या डोंगर माथ्यावर मुसळधार पावसाने दोन दिवसा पासून अतिवृष्टी होत असल्यामुळे
अनेक ठिकाणी पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे आंबे शिवथर येथील स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे
महाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले व रायगड व पुणे जिल्ह्याचे हद्दीवर असणारे शिवथर विभागातील आंबे शिवथर परिसरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे.
आज सकाळी महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढग फुटी सदृश्य पाऊस . झाल्याने या परिसरातील कुंभेशिवथर गावातील स्मशान भूमी वाहून गेली आहे.त्याच प्रमाणे आंबेशिवथर,अंबेनळी,सह्याद्री वाडी गावाचा देखील काहीकाळ संपर्क तुटला होता.त्यामुळे शिवथर विभागातील नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात व पूर्ण परिस्थितीत दरवर्षी पुराचा सामना करावा लागत असल्याने या ठिकाणी सरंक्षण भितींची मागण्या करत असून त्याबरोबर या ठिकाणी आंबेशिवथर ग्रामस्थांनी नवीन पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे त्याचप्रमाणे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली स्मशानभूमी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने बांधून घेण्याची मागणी देखील केली आहे