शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सन्मा. धनेश पाटील (मा . विरोधी पक्षनेता मीरा-भाईंदर महापालिका) व सन्मा. प्रशांत धोंडे साहेब यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, टिफिन बॉक्स नोट बुक्स कंपास बॉक्स वॉटर बॉटल लगेज बॅग इत्यादी साहित्याचे शाळेमध्ये वाटप करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये सन्मा. धनेश जी पाटील साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री वसंतरावजी पाटील साहेब यांनी त्यांचे स्वागत केले. सन्मा. प्रशांतजी धोंडे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन मा. मुख्याध्यापक श्री महाजन बी . सी यांनी त्यांचे स्वागत केले. मा. शशी वाघेला (शिवसेना शाखाप्रमुख)यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत श्री ढेंबरे सर यांनी केले. मा. महेंद्र राठोड यांना पुष्पगुच्छ देऊन मा. जाधव सर यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात राकेश दर्जी (शिवसेना उपविभाग प्रमुख) समाजसेवक श्री विश्वनाथ पवार, खान साहेब, पत्रकार राम यांचेही पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळी गरज पडेल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी असेल असे श्री धनेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले व गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्याचे आश्वासन दिले. शाळेने मला जीवन जगायला शिकवले याचे भान मला सतत असते. या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे श्री प्रशांत धोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यापुढेही शाळेच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणार असे ते म्हणाले. गुरुवर्य वसंतरावजी पाटील सर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे वतीने विशेष सत्कार त्यांचा या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री महाजन बी .सी. यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागल बी .पी. यांनी केले