महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र राज्य #कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दि. 21 जून रोजी नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, दि. 19 जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी असोसिएशनचे सर्वश्री उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य तथा उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *