बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांच्याशी संबंधित धक्कादायक बातमी येत आहे. वास्तविक अलका याज्ञिक या दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डरच्या शिकार झाल्या आहेत.या आजारामुळे गायिका अलका याज्ञिक यांना सध्या ऐकू येत नाही.
या बातमीने बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे.आपल्या आजारासंदर्भात अलका याज्ञिक यांनीच सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.यामध्ये त्यांनी आपल्या आजारपणाबाबात माहिती दिली आहे. मी काही दिवसांपूर्वी एका विमान प्रवासात होते. दरम्यान, विमान प्रवासातून बाहेर आले आणि काही ऐकू येईनासे झाले.
हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे,
सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असे निदान डॉक्टरांनी केले आहे. कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणे टाळा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच तुम्हा सर्वांचे प्रेम आशिर्वाद असेच माझ्यावर राहू द्या.
या कठीण काळात तुमचा पाठिंबा,
प्रेम आशिर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे अलका याज्ञिक म्हणाल्या.
अलका यांनी दिलेली ही माहिती वाचून सगळेच दु:खी झाले आहेत.
चित्रपटसृष्टीतील इला अरुण,
सोनू निगम आणि पूनम धिल्लन या कलाकारांनी अलका यांच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.