शेतीकडे वळा, झेंड्यांच्या मागे नको धावू” – शेतकरी संतोष भोसले यांचे कोकणातील तरुणांना आवाहन

 

महाड (मिलिंद माने) कोकणात तरुण पिढी उद्योग धंद्यासाठी मुंबई, पुणे ,ठाणे या शहरांकडे धाव घेत आहे मात्र गावातील वडिलोपार्जित शेती विकण्याचे व ओसाड राहत असल्याने भविष्यात शेती हेच कुटुंबाला तारणारे साधन ठरणार असून कोकणातील तरुणांनी नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा व नेतेमंडळींच्या मागे झेंडे फिरवत बसण्यापेक्षा शेतीकडे वळण्याचे आवाहन महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील शेतकरी संतोष भोसले यांनी त्यांच्या तीन एकर जागेत लावलेल्या तैवान जातीच्या पेरू लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोकणातील तरुणांनी आदर्श घेऊन शेतीकडे वळण्याच्या आवाहन केले आहे

महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील संतोष रघुनाथ भोसले या नवोदित शेतकऱ्याने नोकरी च्या पाठीमागे न लागता कोकणातील तरुणांनी शेतीपासून कसा आदर्श घ्यावा याचे उत्तम उदाहरण तीन एकर क्षेत्रात तैवान जातीच्या पेरूची लागवड करून कोकणातील नवोदित तरुणां समोर आदर्श ठेवला आहे गरीब कुटुंबातील शेतकरी असून स्वतःकडे असणारी जमीन . केवळ वीस गुंठे असताना बाजूच्या शेतकऱ्याची जमीन भाडेकरारावर घेऊन सुमारे साडेतीन एकर मध्ये तैवान जातीच्या पेरूची लागवड केली आहे
तैवान जातीच्या पेरूची लागवड करून आज १४ महिने झाले आहेत. आज या पेरूच्या बागेमध्ये१२. ते १३ टन पेरू. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून निघणार असून त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की जमीन ही अशी आहे की आपण जेवढे जमिनीत जेवढे टाकू त्याच्यापेक्षा दहापट उत्पन्न आपल्याला जमिनीमधून उपलब्ध होते

 

शासन आपल्या दारी पण मीच नाही घरी अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे………

शेतीतून उत्पन्न घेण्याची शेतकऱ्याकडे कुवत आहे. पण शेतकरी जमिनीवर नसल्यामुळे आज परिस्थिती बिकट आहे शासन आपल्या दारी पण मीच नाही घरी तर होणार कसे

पंढरपूरच्या धनाजीराव शिंदेंचे मोलाचे मार्गदर्शन!
शेतामध्ये एक नवीन वाखाण्यासारखा प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यामागे पंढरपूरचे धनाजीराव शिंदे या प्रगतशील शेतकऱ्यांनी या कामे मला मोलाचे मार्गदर्शन केले शेतीच्या प्रयोगात मार्गदर्शन करणारे व तोंडाने सांगणारे बरेच भेटतात परंतु सत्यामध्ये शेतीच्या बांधावरून प्रत्यक्षात मला शिंदेंसारखी एकमेव व्यक्ती मला भेटली मी माझ्या आयुष्यामध्ये बरेच माझे नुकसान झाले दिशाहीन असलेला शेतकरी होतो योग्य मार्गावर व आलो आहे

तरुण पिढीने आव्हान
शिरसावणे येथील पेरू लागवड करणारे संतोष रघुनाथ भोसले या शेतकऱ्याने तरुण पिढीला आव्हान केले आहे की पेरूच्या निघणाऱ्या १३ टन उत्पादनातून कमीत कमी आठ ते दहा लाखाचे उत्पन्न. घेऊ शकणार आहे अशी जर शेती केली तर आपल्याला पैसे कमवायला दूरवर जावे लागणार नाही नोकरीच्या शोधात धडपड करायची गरज असणार नाही पुढील वर्षी या शेतीतून मला यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दुप्पट उत्पन्न मिळणार आहे.

शेतकरी लखपती होण्यास वेळ लागणार नाही पण योग्य नियोजन व मार्गदर्शन गरजेचे!
शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी लखपती होण्यास वेळ लागणार नाही पण यासाठी योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचे सांगून संतोष भोसले यांनी सांगितले की शेती ही उत्कृष्ट आहे असे सांगून या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवे असेल तर आम्ही शेतीच्या बांधावर येऊन त्यासाठी मार्गदर्शन करू यश पेरूच्या शेतीमध्ये त्यांनी फळ खराब होऊ नये यासाठी म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांनी त्यांना बंदिस्त केले असून आज२२००. तैवान जातीचा पेरूच्या झाडांची लागवड केली आहे ३५०. ते ४०० ग्रॅम. वजनाचे या झाडापासून मिळणार असून एका झाडापासून किमान ५००ते ७०० रुपये उत्पन्न मिळणारा असल्याचे त्यांनी सांगून अशाप्रकारे योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून शेती करण्याचे त्यांनी तरुण पिढीला आव्हान करून शेती करा नोकऱ्यांच्या शोधात फिरण्यापेक्षा व नेतेमंडळींच्या मागे झेंडे फिरवत बसण्यापेक्षा शेतीकडे वळण्याचे त्यांनी कळकळीचे आव्हान कोकणातील तरुणांना केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *