मुंबई – महाड येथील चार प्रकल्पांना गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना दिलेल्या सुप्रमा मार्गी लावाव्यात अशी विनंती सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, विदर्भाच्या बाबतीत उदासीनता नाही तर हे सरकार प्रचंड पुढे येऊन काम करतेय. नागपूर, वर्ध्यापासून बुलढाण्यापर्यंत जमीन सिंचनाखाली येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम प्रकल्प यांना एसएलटीची मान्यता दिली आहे. परंतु त्यांना सुप्रमा का देण्यात आली नाही? तसेच महाड येथील चार प्रकल्पांना सरकारने मान्यता दिली होती. कोकणात प्रचंड प्रमाणात पाणी आहे, आपण ते साठवू शकतो. त्याप्रमाणे कोकणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सुप्रमा दिलेले प्रकल्प अजूनही पुढे गेलेले नाही. ज्या चार प्रकल्पांना सुप्रमा दिल्या आहेत त्या मार्गी लावाव्यात अशी विनंती दरेकरांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, कोकणाकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करतोय. बोर व धाम प्रकल्पाबाबतचा अशासकीय मान्यता प्रस्ताव नियोजन विभागाला सादर करण्यात आलेला आहे. लवकरच मान्यता देण्यात येईल. अधिवेशन झाल्यावर येणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी देऊन तात्काळ सुरु करु, असे सकारात्मक उत्तर दिले.