देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न, राज्यातील अनेक कार्यकर्ते ‘सागर’ बंगल्यावर दाखल
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते देवंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) देशपातळीवर भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत मविआला तब्बल 30 जागांवर यश मिळालं असून महायुती 17 जागांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान या पराभवाची जबाबदारी स्विकारत आपण पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर त्यांच्या मनधरणी साठी अनेक नेत्यांनी सागर बंगल्यावर गर्दी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते देवंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. आमचं संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं म्हणणं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे. आम्हाला विश्वास आहे की, अध्यक्ष जे सांगत आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आजचा जो विचार मांडला तो मागे घेतील. आमचे इतर नेते बोलत आहेत. आम्हाला सगळ्यांना आशा आहे की, ते योग्य निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर दाखल होत आहेत. या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा मागे घेऊ नये, यासाठी विनंती केली जात आहे. सर्व नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम आहेत.