हुक्क्याचा धूर प्रशासनाच्या नजरेआड! मीरा भाईंदरमध्ये उघडपणे बंदीला सुरूंग!

भाईंदर: भाईंदर पूर्वेतील Hangout Lounge Resto & Bar येथे महाराष्ट्र शासनाच्या स्पष्ट बंदीनंतरही हुक्का खुलेआम ग्राहकांना दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दिनांक ५ जुलै २०२५ रोजी रात्री १०:५८ वाजता या ठिकाणी हुक्का पुरवठा झाल्याचे GPS टॅगसह छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये टेबलावर ठेवलेला हुक्का आणि ग्राहकांची उपस्थिती नोंदवलेली आहे, त्यामुळे यावर कोणताही आडपडदा राहिलेला नाही.

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले असूनही, मीरा-भाईंदर परिसरात सर्रासपणे हे गैरकायदेशीर धंदे सुरू आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका प्रशासन यांची भूमिका संशयास्पद ठरते. एवढ्या उघडपणे कायदा तोडला जात असताना कारवाई होत नसेल, तर ती मूक संमती मानली जावी काय?असा प्रश्न सामाजिक संघटना उपस्थित करत आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली असून, तात्काळ गुप्त कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासन आता जागं होणार की अजूनही हुक्क्याच्या धुरात झोपेचे सोंग घेणार? अशी चर्चा मिरा भाईंदर मध्ये चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *