मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त करुन दिलेय आणि संपूर्ण जगाला आरोग्याविषयी दिशा दिलीय. त्यामुळे आज संपूर्ण देशात, जगभरात योगादिन साजरा केला जात आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा येथे प्रथमच योगदिनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल, भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, वॉर्ड अध्यक्ष अमित उतेकर, महिला वॉर्ड अध्यक्षा सोनाली नखुरे, वॉर्ड अध्यक्ष अविनाश राय यांसह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी थेट दिल्लीवरून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत खासदार पियुष गोय, आ. प्रविण दरेकर आणि उपस्थित नागरिकांनी योगासन केले.
याप्रसंगी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिक आणि तरुणांची नेहमीच काळजी केली आहे. त्यामुळे गेल्या ११ वर्षांपासून योगदिन साजरा केला जात आहे. त्याला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे. देशभरातच नाही तर संपूर्ण जगात योगदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी करणारे पंतप्रधान या देशाला लाभले असल्याचेही दरेकरांनी म्हटले. तसेच देशातील नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी रोज योगा करण्याला प्राधान्य द्यावे जेणेकरून आपले. आरोग्य चांगले राहील, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.