जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण आणि शिवीगाळ ८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

 

महाड : (मिलिंद माने)  हॉटेल जमिनीबाबत असलेल्या जुन्या वादातून एका जोडप्याला आठ जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करून जातिवाचक शब्दप्रयोग व अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना १९ जून २०२५ रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास हॉटेल मेजवानी किचन मध्ये.

प्रथमेश विजय जाधव, राहणार डोंगरीपूल, एमजी रोड, महाड रायगड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महाड शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच महाड शहरात घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपीत यांच्यात शहरातील एम.जी. रोड येथील हॉटेल मेजवानी या हॉटेलच्या किचनच्या जागेवरून जुना वाद होता. याच वादावरून गुरुवार १९ जून २०२५ रोजी रात्री २:१५ चे सुमारास आरोपीत यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत अश्लील वर्तन व जातिवाचक शब्दप्रयोग केले. दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रसाद रामकृष्ण जाधव,पूजा प्रसाद जाधव,दर्शन प्रसाद जाधव, यश प्रसाद जाधव, रोशनी यश जाधव, निर्मला सावंत, साहिल सावंत

प्रवीण सावंत. सर्व राहणार काकरतळे महाड -रायगड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास डीवायएसपी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *