मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुगवली पुलावरील रस्त्याला तडे; राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष पावसाळ्यात वाहतूक कोंडीची शक्यता

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुगवली पुलावरील रस्त्याला तडे

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष पावसाळ्यात वाहतूक कोंडीची शक्यता

महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील. माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रेट रस्त्याला तडे गेल्याने पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

 

कोकणात जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा एकमेव महामार्ग असून मागील १७ वर्षापासून. हा महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडला आहे त्यातच या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींसह राज्याचे मंत्री मात्र दरवर्षी आम्हा मार्ग पूर्ण होण्याच्या फक्त घोषणा करतात मात्र पावसाळ्यात या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होते

 

कोकणात जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील १७ वर्षापासून. वादात सापडलेला असतानाच दरवर्षी या महामार्गावर मोठ्या अपघातामुळे कोकणातील जनतेचे बळी गेले आहेत त्यातच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या महामार्गावरील अनेक ठिकाणच्या सिमेंट काँक्रेट रस्त्याला तडे गेले आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र व वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे तर अनेक वाहनांचे पार्ट या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे निकामी झाल्याचे प्रकार घडून अनेक वाहने रस्त्यात बंद पडल्याचे पाहण्यास मिळते

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाणपुलावर असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या व रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर रस्त्याला तडे गेले असून या रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे पावसाळ्यात त्यामध्ये पाणी गेल्यावर हा रस्त्याचा भाग खचून रस्त्याचे दोन वेगवेगळे भाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगडात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची ही झालेली वाताहत पाहता ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या गणपती सणात या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही

कोकणात एक महिन्यापासून मान्सून पूर्व पाऊस पडत होता मात्र आता पावसाला सुरुवात झाली असल्याने आणि पावसाळ्यात या महामार्गावर पडणारे खड्डे व सिमेंट काँक्रेट रस्त्याची होणारे दुरावस्था पाहता चालू वर्षी देखील कोकणातील गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागण्याची शक्यता महामार्गावरील प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *