महाड (मिलिंद माने) : मुंबईमधील राजे फाउंडेशन च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले.
मुंबई लालबाग येथील राजे फाउंडेशन च्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनाचा आनंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. येथील अक्षय ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले असून जवळपास १४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धांत अशोक पिसाळ, संस्थापक –अध्यक्ष रोहित अशोक पिसाळ, संस्थापक /सचिव पंकज सूर्यकांत कोल्हे, खजिनदार योषित श्रीधर नागावकर, उपाध्यक्ष मयुरेश दिलीप पाटील उपाध्यक्ष संतोष मारुती पवार, सहसचिव ऋषिकेश आचारी, उपखजिनदार मयुरेश अनंत पाटील, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप कस्तुरे सोशल मीडिया प्रमुख कार्यकारणी सदस्य – विशाल साळुंखे, रवींद्र साडेकर, उन्मेष ठाकूर, मनोज पोळ आदरणीय विशेष मेहनत घेतली. ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना भेटवस्तू म्हणून आपल्या राजे फाउंडेशन तर्फे डिजिटल स्मार्ट वॉच, ब्लूटूथ इयरपॉड्स (हेडफोन), अमेरिकन टूरिस्टर ची बॅग, मिल्टन चा पाण्याचा जार, आणि मिल्टन कंपनीचा टिफिन सेट या वस्तू देण्यात आले.