छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

सीएसएमटी स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता होणार रवाना

मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे.

 

IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे.

 

ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव देईल. सोयीसुविधा, सांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *