महाड दापोली स्पीड ब्रेकर मुळे झाला एसटीचा अपघात

महाड (मिलिंद माने) महाड दापोली रस्त्यावर. शिरगाव ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये हॉटेल हिल टाऊन जवळ रस्त्यावर टाकलेल्या स्पीडब्रेकर मुळे खेड बोरवली एसटी बसला अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे

 

महाड दापोली राज्य मार्गावर खेड बोरवली MH. २०.BL.२२४२ ही बस शिरगाव गावाजवळ असणारा हिल टाउन हॉटेल जवळ आली असता त्या ठिकाणी टाकण्यात आलेला स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारले नसल्याने एसटी चालकाला न दिसल्यामुळे ब्रेक मारल्यामुळे एसटी घसरून रस्त्याच्या साईड पट्टीला जाऊन धडकली सुदैवाने एसटी चालकाचे प्रसंगावधान या कामी आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे वास्तविकता या ठिकाणी टाकण्यात आलेला स्पीड ब्रेकर अचानक पणे टाकल्याने व त्यावर असणारे पांढरे पट्टे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे या वेळेला अनेक वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी सांगितले

महाड दापोली राज्य मार्गावर सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डांबरीच्या थरामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने या यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या अक्कल हुशारीने या रस्त्यावर जेसीबीने खरवडण्याचे प्रकार चालू केले आहेत तर काही ठिकाणी याच रस्त्यावर खडी टाकून रोलरने दाबण्याचे प्रकार तर अनावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकल्याने आज अपघात झाला त्याला हे स्पीड ब्रेकरच कारणीभूत आहेत वास्तविकता स्पीड ब्रेकर टाकल्यानंतर त्या ठिकाणी १०० मीटर अगोदर. पुढे स्पीड ब्रेकर आहे असा फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारचे फलक न लावल्याने खेड बोरवली गाडीला आज अपघात झाला तसेच अपघात या रस्त्यावर पावसाळ्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *