महाड विन्हेरे दापोली मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटी अपघातात नऊ प्रवासी जखमी

तीव्र उतार आणि गुळगुळीत रस्ता अपघातात कारणीभूत 


महाड – (मिलिंद माने) महाड विन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फौजी अंबवडे पुणे व महाड फौजी आंबवडे या दोन बसशी समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दोन बसमधील दोन चालक व एक वाहक व सहा प्रवासी गंभीर इथे जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 

महाड दापोली या मार्गावर आठवडाभरात सात अपघात झाले आहे आज झालेल्या एसटीच्या अपघातामध्ये देखील प्रवासी जखमी झाले आहेत. तीव्र उतार आणि डांबरी गुळगुळीत रस्ता यामुळे पहिल्याच पावसामध्ये वाहने घसरून एकमेकांवर आदळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

महाड दापोली राज्य मार्गावर पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उतारावर वाहने घसरून अपघात होत आहेत. मागील आठ दिवसात या मार्गावर एसटीचे दोन तर इतर वाहनांचे असे एकूण सात अपघात झाले आहेत. आज सायंकाळी . फौजी आंबोडे गावातून दुपारी तीन वाजता सुटणारी फौजी अंबवडे पुणे व महाड आगारातून चार वाजता सुटणारी महाड फौजी अंबवडे या दोन बस या रस्त्यावरील पुरले गावाजवळ समोरासमोर आले असता त्यावेळी पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता निसरडा व गुळगुळीत झाल्याने झाल्याने दोन एसटी बस समोरासमोर जाऊन धडकल्या या धडकेमध्ये देखील चालकासह प्रवासी जखमी झाले आहेत.

महाड विन्हेरे दापोली मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून सुरू झाला होता. सन २००५ मध्ये महाडमध्ये आलेल्या महापूरा दरम्यान या मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. त्यानंतर कशेडी घाटामध्ये घाट खचण्याचे प्रमाण वाढले होते अशावेळी देखील चाकरमान्यांना महाड दापोली, खेड या रस्त्याचा वापर करणे सोयीस्कर झाले होते. यामुळे या मार्गाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने . डांबरीकरणाचे काम झाले होते. गेले अनेक वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या देखभाल दुरुस्ती मुळे हा रस्ता अत्यंत गुळगुळीत आणि प्रवासाला सुखकर होता.

महाड दापोली हा रस्ता डांबरी रस्ता असल्याने या मार्गावरून वाहनाची वर्दळ गणेशोत्सव, होळी, व मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये. तसेच दापोली खेड रत्नागिरी येथे जाणारे पर्यटक देखील या रस्त्याने जात असल्याने या मार्गावरील वर्दळ वाढली होती. मात्र गेली आठवडाभरामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने पडलेल्या पाण्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. गुळगुळीत रस्ता असल्याने वाहन चालकांचा वेग देखील अधिक असल्याने वाहने नियंत्रणात आणणे कठीण जात आहे यामुळे हे अपघात होत असल्याचे गिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचे म्हणणे आहे.

 

अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी रस्त्यावर खडी टाकून रोलर खाली दाबण्याच्या अजब प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला होता. त्यानंतर देखील एक ट्रक घसरून झालेल्या अपघातात झाला. आज सायंकाळी पडणाऱ्या पावसामध्ये दोन एसटीचा समोरासमोर अपघात होऊन.९ प्रवासी जखमी झाले आहेत. फौजी अंबावडे पुणे आणि महाड फौजी अंबावडे या दोन एसटी बसेसची समोरासमोर टक्कर झाली. या बसेस च्या अपघातात चालकासह काही प्रवासी जखमी झाले आहेत.

 

अपघात स्थळांवर स्पीड ब्रेकर

महाड दापोली राज्य मार्गावर अपघात स्थळावर स्पीड ब्रेकर टाकण्याच्या नव्या प्रयोगामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर व त्यावर घाईघाईने मारलेले पांढरे पट्टे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नेमका स्पीड ब्रेकर कुठे आहे हे नवीन वाहन चालकांना कळत नसल्याने या स्पीड ब्रेकर मुळे पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे. गतीरोधक असल्याचे सूचनाफलक लावले नसल्याने पावसामध्ये डांबरावरील हे गतिरोधक दिसून येत नाहीत. यामुळे अपघातांची मालिका सुरूच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राष्ट्राचे डांबरीकरणातील काम व्यवस्थित असताना पुन्हा डांबर मारून तो रस्ता गुळगुळीत केल्यामुळे या रस्त्यावर झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसहित संबंधी ठेकेदार हा पूर्णपणे जबाबदार असून त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जर संबंधित ठेकेदारा विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *