अपघात प्रवण क्षेत्रातील रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा – सोमनाथ ओझर्डे
महाड दापोली मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रासाठी टाकण्यात आलेल्या अनधिकृत स्पीड ब्रेकर मुळे पुन्हा अपघाताचा धोका!
महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर मागील आठ दिवसात झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या अनधिकृत कामामुळे झालेल्या अपघातावर उपाययोजना करण्यासाठी रस्त्यावर खडी टाकून रोलर खाली दाबण्याच्या प्रयोगानंतर आता टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर मुळे पुन्हा अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त केली जात असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी एक ट्रक घसरून झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अभियंतांनी सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे
महाड दापोली राज्य मार्गावर मागील आठ दिवसात रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या अयशस्वी प्रयोगानंतर अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून झालेल्या अपघातामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड जागे झाले व त्यानंतर त्यांनी अपघात ग्रस्त ठिकाणावर खडी टाकून रोलर खाली दाबण्याचा अयशस्वी प्रयोग केल्यानंतर याबद्दल पुन्हा नागरिकांकडून व प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केल्यानंतर . करंजाडी येथील उतारा मध्ये स्पीड ब्रेकर टाकून नवीन अनोखा प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविला आहे
महाड दापोली राज्य मार्गावर अपघात स्थळावर स्पीड ब्रेकर टाकण्याच्या नव्या प्रयोगामुळे पुन्हा अपघात होण्याची धोका निर्माण झाला . असतानाच पुन्हा एक अवजड ट्रक चालकाने या उतारा ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता ट्रक घसरून रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अवकाळी पावसामुळे टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर व त्यावर घाईघाईने मारलेले पांढरे पट्टे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नेमका स्पीड ब्रेकर कुठे आहे हे नवीन वाहन चालकांना कळत नसल्याने या स्पीड ब्रेकर मुळे पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे
महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अपघात . स्थळाच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरची उंची व रुंदी किती असावी याबाबत काही नियमावली असताना तसेच स्पीड ब्रेकरच्या ठिकाणाच्या पूर्वी दोन्ही बाजूस स्पीडब्रेकर आहे याबाबतचा नामफलक लावणे बंधनकारक आहे मात्र तशी कोणतीच पूर्वसूचना वाहन चालकांना समजत नसल्याने रात्रीच्या वेळेस हे स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी पुन्हा एकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र स्पीड ब्रेकर चे काम करताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता प्रत्यक्षात हजर नसताना ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केलेले स्पीड ब्रेकर हे अपघाताला निमंत्रण देणारे असून या ठिकाणी अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल या मार्गावरून जाणारे वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अभियंत्यांना विचारत आहेत
महाडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता सनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड दापोली राज्य मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रात रस्त्यावर खडी टाकून रोलर खाली दाबण्याचा उद्योग ठेकेदारामार्फत चालू आहे मात्र हे करीत असताना त्याच ठिकाण पासून १०० मीटर अंतरावर. करंजाडी येथील उतारात एक अवजड ट्रक चालकाने ब्रेक मारला असता वाहन घसरल्याने समोरील भिंतीला जाऊन ट्रक धडकला मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे असले तरी या संपूर्ण प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांना दिला आहे आता प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता सनाळकर हे संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कोणती कारवाई करतात की पुन्हा एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहेत असा प्रश्न या निमित्ताने या मार्गावरून प्रवास करणारे असंख्य प्रवासी विचारीत आहेत