महाड दापोली मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रावर खडी टाकण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब प्रकार

महाड – (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर एप्रिल महिन्यात केवळ डांबर मारून त्यावर ग्रिट चा मुलामा केल्याने अवकाळी पावसातच अपघाताची मालिका सुरू झाली. आता याठिकाणी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघात प्रवण क्षेत्रात खडी टाकून रोलर खाली दाबण्याचा अजब प्रकार सद्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे नवीन तंत्रज्ञान पुन्हा अपघाताला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे.

महाड दापोली राज्य मार्गावर मागील आठ दिवसात करंजाडी बुद्धवाडी या ठिकाणी मिनीडोअर व आयशर टेम्पो यांच्या अपघातात दोन प्रवासी मृत्युमुखी पडले तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाले यानंतर याच ठिकाणी स्वारगेट विन्हेरे या एसटी बसला अपघात होऊन एसटीतून प्रवास करणाऱ्या १५ प्रवाशांपैकी. वाहचालकासहित ७ जण गंभीर रित्या जखमी झाले. या अपघाताची मालिका संपण्यापूर्वी पुन्हा एकदा सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ईरटीका कार व सिमेंट वाहतूक करणारा ट्रक यांची त्या ठिकाणी वाहने घसरून पुन्हा एकदा अपघात झाला मात्र सुदैवाने जीवित हानी टळली.

 

महाड दापोली राज्य मार्गावर शिरगाव फाटा ते लाटून हद्दीत रेवतळे आंग्रे कोंड येथे एक मालवाहू वाहतूक टेम्पोला अशाच पद्धतीने अपघात झाला या मार्गावर एप्रिल महिन्यात केलेल्या डांबरीकरणाच्या अजब पद्धतीमुळे या मार्गावर पावसाळ्यापूर्वीच अपघातांची मालिका चालू झाली आहे. महाड दापोली मार्गावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदारात जबाबदार असल्याचा आरोप शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड चे अभियंता सनाळकर यांच्या डोळ्यावरील काळी पट्टी बाजूला होऊन त्यांना जाग आल्याने या मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रातील गुळगुळीत रस्त्यावरती खडी टाकून ती रोलर खाली प्रेस करून रस्ता खडबडीत करण्याचा अजब प्रकार आज सकाळपासून चालविला आहे मात्र यामुळे पुन्हा या मार्गावर अपघात घडणार असून याला जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे मात्र या या डांबरीकरण रस्त्यावर खडी टाकून ती रोलर खाली प्रेस करून पुन्हा रस्ता खडबडीत करण्याचा अजब प्रकार ही नवीन टेक्नॉलॉजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने निर्माण केली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *