घाटकोपर ता 20 – राष्ट्रिय आंतरराष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत पदकांची कमाई करत देशाचा तिरंगा फडकवत ठेवणाऱ्या मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याची नुकतीच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जयेश ट्रेनिंग क्लासेसचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. या परीक्षेत शिस्त , तंत्रज्ञान , चिकाटीचे उत्तम प्रदर्शन करत विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. जे टी सी चे अनुभवी प्रशिक्षक निशांत शिंदे , यश दळवी , प्रणय मुल्की, विक्रांत देसाई , स्वप्नील शिंदे , चंदन परीदा, कृपेश रणक्षेत्रे , फ्रँक कनाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवले. तायक्वादो या खेळाचे ब्लॅक बेल्टचे प्रमाणपत्र हे साऊथ कोरिया येथील कुक्किवान या जागतिक हेडक्वार्टर येथून येते. एकूण 25 तायक्वादो खेळाडूंनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.