महाड – (मिलिंद माने) महाड जवळील सावित्री खाडीपात्रात महाड शहराजवळील सावित्री नदी जवळील दादली पुलाजवळ भोई घाट व केंबुर्ली या दोन ठिकाणी कोणत्याही प्रकारची महसूल खात्याची व पाटबंधारे विभागाची परवानगी नसताना अनधिकृतरित्या गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू केले आहे याबाबत तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही रिप्लाय दिला नाही. एकंदरीत वाळू उत्खनन करणारे जोरात तर महसूल खाते कोमात गेल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे
महाड जवळील सावित्री खाडीमध्ये १ मे महाराष्ट्र दिन रात्रीच्या सुमारास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्या मुठवली तसेच केंबुर्ली येथील वाळू डेपोवर अचानक टाकलेल्या धाडी मध्ये . मुठवली येथील अनधिकृत वाळू साठ्यावर कारवाई केली आहे. मुठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनी व्यवस्थापना विरोधात व या कंपनीबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जागेचा करारनामा केलेला आहे त्यांच्या विरोधात १३० ब्रास अनधिकृत वाळू उत्खननाचा वाळू साठा जप्त केला व सुमारे ३० लाख रुपयांचा दंड आकारला आहे असल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली.
या ठिकाणी जवळपास 130 ब्रास वाळू अनधिकृत रित्या सापडलेले आहे यावर कारवाई करण्यात आली असून सुमारे 30 लाख रुपये दंड बसवण्यात आला आहे अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाईल : महेश शितोळे तहसीलदार महाड. यांनी सांगून काही दिवसाचा अवधी जातो न जातो तोच पुन्हा केभुर्ली या ठिकाणी आज दुपारपासूनच मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन अनधिकृत रित्या चालू केल आहे त्याचबरोबर महाड शहराजवळील भोईघाटाजवळ देखील अनधिकृत रित्या गाळ काढण्याच्या नावाखाली उत्खनन चालू केले आहे
पावसाळा तोंडावर आला असताना त्यातच अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर कोकणात चालू झाला आहे. पावसाळ्याची परिस्थिती चालू झाली असून शेतकरी वर्ग शेतीच्या कामाला लागला आहे पावसाळ्याच्या काळात नदी प्रवाहातील जलचर प्राणी हे प्रजनन काळासाठी नदीकिनारी येत असतात यामुळे पावसाळ्याचा हंगाम चालू झाल्यानंतर नदी व खाडीपात्रात जलचर प्राण्यांच्या प्रजनन काळासाठी उत्खननावर बंदी असताना बेकायदेशीर उत्खनन करणारे जोमात आहे तर तहसीलदार कार्यालय व त्यांचे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तलाठी हे मात्र कोमात गेल्या असून नक्की शासनाचा महसूल वाढवण्याचे काम महाड तहसील कार्यालय करते की बुडवण्याचे काम करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे