दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने चित्रनगरीतील कामगार व कलाकारांसाठी सुरक्षित वाहतूक सुविधेसाठी शटल सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे ऑल इंडिया प्रेसिडेंट अजित म्हामूनकर यांच्या आदेशानुसार युनियनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत चित्रनगरीत दररोज चित्रीकरणासाठी येणाऱ्या हजारो टेक्निशियन, जूनियर आर्टिस्ट, महिला कर्मचारी व कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शटल सेवा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. खासकरून पावसाळ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव व रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळाने पुढील मागण्या मांडल्या- १) दैनंदिन शटल सेवा चित्रनगरीत सुरू करावी. २) १५-२० मिनिटांच्या अंतराने शटल सेवा चालवावी. ३) कामगार व महिलांना अत्यल्प दरात ही सेवा द्यावी. ४) सुरक्षेसाठी वाहनांत CCTV व सुरक्षा कर्मचारी नियुक्त करावेत. यावेळी युनियनचे मुंबई अध्यक्ष देवेंद्र पंडित व दक्षिण मुंबई अध्यक्ष विद्याधर बने उपस्थित होते. ह्याबाबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत
याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.