मिरा-भाईंदर महानगरपालिकेत न्यायालयीन प्रक्रियेवरील विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न

 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विधी विभागाच्या वतीने महापालिकेतील वर्ग १-३ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “न्यायालयीन प्रक्रिया (Litigation Management)” या विषयावर एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक ८ मे २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरभवन (नगरभवन) येथे करण्यात आले. या शिबिराचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार करण्यात आले होते.

 

प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, मनपा विधी अधिकारी सई वडके तसेच वर्ग १ ते ३ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात कायद्यातील मूलभूत संकल्पना, न्यायालयीन प्रक्रिया, विविध प्रकारचे दावे, तक्रार दाखल करण्याची पद्धत आणि न्यायालयाचे आदेश पालिकेवर कशाप्रकारे बंधनकारक असतात या बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

नवी मुंबई महानगरपालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांनी या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल व व्यावहारिक मार्गदर्शनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया अधिक समजण्यास मदत झाली. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी मार्गदर्शकांशी संवाद साधत प्रत्यक्ष कामकाजात उपयोगी ठरणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा केली.

 

महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी या शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना, न्यायालयीन प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत अधिकाधिक सखोल व व्यावहारिक ज्ञान मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमात विशेष मार्गदर्शन करणाऱ्या विधी अधिकारी अभय जाधव यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

महानगरपालिकेच्या वतीने या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *