डोंबिवलीत दि बा पाटील यांच्या नावाने नवी मुंबई विमानतळ होण्याच्या प्रस्तावावर सविस्तर विचारमंथन; आंदोलनातील कार्यकर्त्यांचा सत्कार

डोंबिवली: लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नाविकरण करणे यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्वपक्षीय कृती समितीने विचारमंथन बैठक आयोजित केली. या बैठकीत विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव लागावे या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पुढील पावले ठरवण्यात आली.

बैठकीत उपस्थितांना माहिती दिले की, दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात स्मरणपत्र देण्यात आले होते. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात गेला आहे आणि लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल. त्यामुळे, नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी लोकनेते दि बा पाटील यांचे नाव लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचा ‘दि.बा.योद्धा’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रमुख व्यक्तिमत्वे म्हणून श्री. दशरथदादा पाटील, श्री. रामशेठजी ठाकूर, केंद्रीय मंत्री श्री. कपिलजी पाटील, खासदार श्री. जगन्नाथजी पाटील, आमदार श्री. राजेशजी मोरे, आमदार श्री. सुभाषजी भोईर, उपमहापौर श्री. जगदीशजी गायकवाड यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते, समाज प्रतिनिधी आणि नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत पुढील पावले निश्चित करत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नाविकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *