बई- मुंबईत आज स्वयं पुनर्विकास योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. १६०० प्रस्ताव मुंबई बँकेकडे स्वयं पुनर्विकासाचे कर्ज मागण्यासाठी आलेत. आम्ही ३६ ते ३८ संस्थाना कर्जही दिलेय. इमारतीचे काम सुरू आहे. परंतु मागणी वाढत असल्याने पैसे मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. राज्य सहकारी बँक दीड हजार कोटी देणार आहे. एनसीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटी दिले जाणार आहेत. यासाठी सरकारने सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन निर्माण करावे, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात २६० च्या प्रस्तावावर बोलताना केली.
आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे गती घेताना दिसताहेत. स्टार्ट अपला केंद्राने महत्व दिलेय. स्टार्ट अपची संख्या महाराष्ट्रात वाढतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताहेत. मुख्यमंत्री म्हणाले कि अशा महामार्गाची आवश्यकता आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा माल तेथून जाणार आहे, तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत. परंतु विरोधी पक्षातील लोकं या महामार्गात अडथळे कसे येतील याची काळजी घेताना दुर्दैवाने दिसताहेत. अशा प्रकारचा महामार्ग झाला पाहिजे त्याने जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
दरेकर पुढे म्हणाले कि, गृहनिर्माण हा महत्वाचा विषय आहे. विकास होत असताना मुंबईतील रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसताहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या काही महिन्यात कोट्यावधी रुपयाचे भाडेही देण्याचे धोरण बनवले. जे वंचित भाडेकरू होते त्यांना भाडे मिळवून दिलेय. अनेक मोठे प्रकल्प जे रखडले होते ते आज खऱ्या अर्थाने मार्गी लागताहेत. सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत ते हे मोठे प्रकल्प करणार आहेत. सरकारवर लोकांचा विश्वास आहे. केवळ बोलून हे सरकार थांबलेले नाही तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रमाबाई आंबेडकरमधील प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पुनर्विकासात मोठे काम निर्माण होताना दिसतेय.
दरेकर पुढे म्हणाले की, देशात महिला युवकांत प्रचंड टॅलेंट आहे फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज होती. ही दूरदृष्टी पंतप्रधान मोदींनी ओळखली आणि स्टार्ट अप आणले. विरोधकांनी टीका केली. पण आज 9वर्षानंतर काय परिस्थिती आहे हे विरोधकांनी जाणून घेतले पाहिजे. स्टार्ट अप सुरू झाले तेव्हा देशात ४७१ स्टार्ट अप होते आणि आज १ लाख ५७ हजार स्टार्ट अप आहेत . याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. २५ हजारापेक्षा जास्त स्टार्ट अप महाराष्ट्रात आहेत. स्टार्ट अपचे लोन हळूहळू ग्रामीण भागातही पोचतेय. याच सारे श्रेय पंतप्रधान मोदींना आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा झाली. जनतेसाठी हा महामार्ग सुरू झालाय. विरोधकांनी मात्र महाराष्ट्राला मागे नेणारा प्रकल्प असल्याचे सांगत फडणवीसांना हिणवण्याचे काम केले. परंतु फडणवीसांनी या टीकेला थारा न देता संयमाने हा प्रकल्प पूर्ण केला. मात्र २०१९ ला महाविकास आघाडीने या महामार्गाचे उद्घाटन केले. त्याचे साधे निमंत्रण फडणवीसांना दिले नाही. उबाठाने एकीकडे भूसंपादनाला विरोध केला तर दुसरीकडे महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी केली. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेला माहित आहे.