दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता /भारतीय नागरिक सुरक्षा संहिता/भारतीय साक्ष अधिनियम नवीन कायद्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा/जनजागृती
मुंबई पोलीस आयुक्तालय मुंबई शहर पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१२ अंतर्गत दहिसर पोलीस ठाणे यांनी दिडोंशी न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता एडव्होकेट उषा जाधव यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.सर्वप्रथम पोलीस सहाय्यक आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोक होनमाने यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सम्मान करण्यात आला.तेथे उपस्थित जेष्ठ नागरिक, महिला, तरूण सर्वांनाच सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान देण्यात आले. व्याख्याता उषा जाधव यांनी नागरिकांची कर्तव्य आणि हक्क या विषयी विचार प्रभावशील मांडले. त्याप्रमाणेच प्रामुख्याने मारहाणी, बिल्डरांकडून होणारी फसवणूक, लहान मुलांचे मानसिक व शारीरिक छळ, जेष्ठ नागरिकांवर होणारे पारिवारिक अन्याय, रोखण्यास जनजागृतीपर विचार मांडून मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील जेष्ठ नागरिकांच्या न्यायालय माहिती उपलब्ध करून देण्यात आले.उपस्थितीत श्रोतृवर्गाकडून आलेल्या इच्छा पत्रक मुख्यतः शासकीय रजिस्टर नोंदणीकृत खूप आवश्यक आहे. या स्तुत्य उपक्रमाची व्यवस्था पोलीस निरीक्षक जनसंपर्क अधिकारी-विवेक सोनावणे, गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक अशोक नाना घुगे, तसेच सायबर क्राईम प्रतिबंधक विभाग उपपोलीस निरीक्षक अंकुश दाडंगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिक उडान परिवार प्रमुख शिरीष पारीख, हेमंत इनामदार, धनशुकभाई, बाळ वैद्य इत्यादीं उपस्थितीत होते.