पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने दुसऱ्यांदा क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, पोस्ट शेअर करून सांगितलं कारण

Spread the love

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अजून एका खेळाडूने सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण पाकिस्तानच्या या खेळाडूने पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे. यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने निवृत्ती जाहीर केली. आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. जाहीर केले होते.दोन दिवसांत निवृत्ती घेणारा मोहम्मद आमिर हा पाकिस्तानमधील दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्या एक दिवस आधी इमाद वसीमनेही असाच निर्णय घेतला होता. या दोघांनीही तेच खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी निवृत्ती घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.मोहम्मद आमिरची गेल्या ३ वर्षांतील ही दुसरी निवृत्ती आहे. त्याने २०२१ मध्ये पहिल्यांदा निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर मार्च २०२३ मध्ये तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता. आता त्याने २१ महिन्यांनी पुन्हा निवृत्तीची घोषणा केली आहे. मोहम्मद आमिर सोल मीडियावर फोटो शेअर करून निवृत्त घेत असल्याचे म्हटले आहे. निवृत्तीची घोषणा करताना डावखुऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर लिहिले की, खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे, हा निर्णय घेणं अजिबातच सोपं नाही. पाकिस्तान क्रिकेटच्या हितासाठी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे, जेणेकरून नवीन प्रतिभावान तरुणांना पुढे येऊन देशासाठी खेळण्याची संधी मिळू शकेल. क्रिकेटमध्ये मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. यामध्ये पीसीबी, माझे कुटुंब आणि मित्रपरिवाराने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.
मोहम्मद आमिरची कारकीर्द
३२ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाकिस्तानसाठी ३६ कसोटी, ६१ वनडे आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११९ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत ८१ विकेट घेतल्या. तर टी-२० मध्ये त्याने ७१ विकेट्स घेतल्या आहेत. २००९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये २७१ विकेट घेणारा आणि ११७९ धावा करणारा मोहम्मद आमिर प्रामुख्याने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धच्या त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तेथे त्याने भारताविरुद्ध १६ धावांत ३ विकेट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *