तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल? वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “तिच्यासारखी दिसणारी…”

Spread the love

भिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या त्यांच्या चित्रपट, मालिकेतील भूमिकेमुळे सतत चर्चेत असतात. आता मात्र एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जर त्यांच्यावर बायोपिक आला तर त्यामध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे. लोकशाही मराठी फ्रेंडली या यूट्यूब चॅनेलला वर्षा उसगांवकरांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आले की, समजा तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल? यावर उत्तर देताना वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “मला वाटतं एक काळ असा होता की अर्चना जोगळेकर आणि माझ्यात साध्यर्म्य आहे, असे लोक म्हणायचे. मला पुरस्कार मिळाला की लोक तिचे अभिनंदन करायचे. तिला मिळाला तर माझं अभिनंदन करायचे. तर अर्चना जोगळेकरसारखी दिसणारी तरूण अभिनेत्री कोण असती तर मी म्हटलं असतं तिला माझ्या बायोपिकमध्ये घ्या. पण, तिच्यासारखी दिसणारी मला आता तरी कोणी वाटत नाही. पटकन कोणी डोळ्यासमोर येत नाही.”
याच मुलाखतीत वर्षा उसगांवकरांनी ‘बिग बॉस मराठी ५’मधील सदस्यांविषयी त्यांचे मत मांडले आहे. अरबाज, निक्की, जान्हवी, अभिजीत, सूरज, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर अशा सर्व सदस्यांबद्दल त्यांचे मत त्यांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच वर्षा उसगांवकरांनी मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला आहे. ऋषी कपूर यांच्याबरोबर त्यांनी ‘हनिमून’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्यावेळी ऋषी कपूर सेटवर यायचे तेव्हा जास्त बोलायचे नाहीत, त्यामुळे ते खडूस आहेत असे मला वाटत होते, असे वर्षा उसगांवकरांनी म्हटले. पुढे त्यांच्याबद्दल बोलताना वर्षा उसगांवकरांनी म्हटले की, मी त्यांचे ‘खुल्लम खुल्ला’ हे आत्मचरित्र वाचले. त्यामध्ये त्यांनी माझ्याबरोबर काम केल्याचा उल्लेख केला आहे, त्यामुळे ते खडूस होते हा माझा गैरसमज होता असे म्हणत वर्षा उसगांवकरांनी आठवण सांगितली आहे.दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये जाण्याआधी वर्षा उसगांवकर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत माईची भूमिका निभावताना दिसल्या होत्या. आता ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. आता अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *