अमृता खानविलकरच्या हाताला झाली दुखापत, फोटो शेअर करत दिली सविस्तर माहिती; म्हणाली, “मी अजून…”

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याने चाहत्यांना वेड लावले आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘चंद्रा’ हे गाणे असो किंवा ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ गाणे असो या सर्व गाण्यांवरच्या नृत्याने अमृताने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तर नृत्याबरोबरच तितक्याच ताकदीच्या अभिनयाने अमृताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.अभिनेत्री म्हणून पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना खऱ्या आयुष्यात काय सुरु याच्याअपडेट्ससुद्धा ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या नव्या सिनेमाची किंवा नव्या प्रॉजेक्ट याची माहिती अमृता शेअर करत असते. आता अमृताने एक नवी पोस्ट शेअर केली असून या पोस्टने तिच्या चाहत्यांची आणि तिच्या कलाकार मित्रमैत्रीणींची चिंता वाढवली आहे.अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिच्या हाताला पट्टी बांधलेली असून तिला दुखापत झाली आहे असे दिसते. अमृताने हाताचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोत तिच्या हाताला सूज आल्याचे पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोत तिच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे. अमृताने या फोटोला “मी अजून रिकव्हर होत आहे, लवकरच बरी होईन, पुढे चालत राहा”, अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोवर चाहते आणि कलाकार कमेंट करत तिच्या आरोग्याची माहिती घेत आहेत.अमृताच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करून विचारले की, “माइल्ड फ्रॅक्चर झालंय का?” त्यावर अभिनेत्री म्हणाली, “फ्रॅक्चर नाही… हातातील सॉफ्ट टिशू डॅमेज झालंय.” अमृताच्या या पोस्टवर अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने “काळजी घे ग” अशी कमेंट केली आहे, तर हिंदी मालिका आणि वेब सीरिजमधील अभिनेत्री नीती टेलरने “विशिंग यू स्पीडी रिकव्हरी” अशी कमेंट केली आहे.अमृता खानविलकर सध्या ‘लाईक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच अमृता सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *