दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल‘चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध आ. प्रविण दरेकरांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

 

पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संघ शिक्षण-प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संघाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वतः महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या संघाचे नेतृत्व वसंतदादा पाटील यांच्यासहित राज्याच्या सहकारातील धुरिणांनी केले त्या राज्य सहकारी संघाची निवडणूक २०२५-२०३० करिता २७ जुलै रोजी पार पडणार आहे. ही निवडणूक मी स्वतः तसेच राज्य सहकारी मजूर संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल म्हणून सामोरे जात आहोत. निवडणुकीत एकूण २१ जागा असून त्यापैकी आमच्या पॅनेलच्या ९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार यांचा आशीर्वाद निश्चितपणे सहकार पॅनेलच्या मागे असल्याने ही यशस्वी घोडदौड करता आल्याचेही दरेकर म्हणाले.

 

दरेकर पुढे म्हणाले की, इतर संस्था मतदार संघात ५ जागांसाठी निवडणूक होतेय. त्यामध्ये नंदकुमार काटकर, या पॅनेलचे नेतृत्व करणारे संजीव कुसाळकर, सुनील पाटील (सांगली), नितीन बनकर, सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष रामदासमोरे, अर्जुनराव बोबडे (ओबीसी,अहिल्यानगर), धनंजय शेडगे (कोल्हापूर), वसंत पाटील (नागपूर), प्रकाश भिशीकर (नागपूर), अशोक जगताप हे निवडणूक लढवत असून आमच्या पॅनेलची निशाणी कपबशी आहे. एकूण ९ मतदान केंद्रावर ही निवडणूक संपन्न होणार असल्याची माहितीही दरेकरांनी यावेळी दिली.

 

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

 

१) आ.प्रविण दरेकर (मुंबई मतदार संघ)

२) अनिल गजरे (भटक्या विमुक्त जाती-जमाती)

३) विष्णू घुमरे (राखीव मतदार संघ)

४) हिरामण सातकर (पुणे मतदारसंघ)

५) प्रकाश दरेकर (राज्यस्तरीय मतदारसंघ)

६) गुलाबराव मगर (मराठवाडा विभाग मतदारसंघ)

७) अरुण पानसरे (कोकण विभाग मतदारसंघ)

८) जयश्री पांचाळ (महिला राखीव मतदार संघ)

९) दिपश्री नलावडे (महिला राखीव मतदार संघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *