मिरा-भाईंदर :२६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर भाईंदर पश्चिम फाटक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ध्वजारोहण सोहळ्यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (मुख्यालय) डॉ. सचिन बांगर, उपायुक्त कविता बोरकर, उपायुक्त प्रणाली घोंगे, शहर अभियंता दीपक खांबित यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.