भाईंदरच्या उत्तन परिसरात गेल्या महिन्यात दिनांक २२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धाच्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात आले असून उत्तन पोलिसांनी यशस्वी कामगिरी करत दोन अल्पवयीन जोडप्याला अटक केली आहे. ज्या व्यक्तीच्या हत्या झाली त्या व्यक्तीच्या कंपनीत १६ वर्षीय तरुणी काम करत होती. मालकाने कंपनीत काम करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता.
१५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळेस उत्तन नाका ते डोंगरी मार्गे धारावी देवी मंदिराकडे रिक्षात बसुन जात असताना मयत व्यक्तीने १६ वर्षीय अल्पवयीन हिच्या पोटावर हात फिरवुन १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर या मुलीने आपल्या १७ वर्षीय मित्राच्या मदतीने कंपनी मालकाची डोक्यात लादी घालून हत्या केली.
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुला आणि मुलीने मृतदेह उत्तन दर्ग्याजवळ झाडाझुडुपात टाकून पसार झाले होते. या प्रकरणात मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाद्वारे या हत्येचा उलगडा करत एका १६ वर्षीय मुलीला व १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.