दोन एस टी बसेसच्या धडकेत ५ प्रवासी किरकोळ जखमी

महाड – (मिलिंद माने) :  महाड एसटी बस आगारातून सुटलेली महाड सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एस टी बसेसची समोरासमोर जोरात धडक झाली या धडके दोन्ही बस मधून प्रवास करणारे ५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाड वरून सांदोशी गावाकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच २० बी एल ३७८१ तर माणगाव वरून किल्ले रायगडाकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच १४ बी टी १४१६ या दोन बसेस बांधणीच्या माळावर येताच समोरा समोर टक्कर झाली या अपघातात . एसटी बस चालक अविनाश विंचोरकर तर गणपत कदम, सीता कदम, गणेश जाधव, राजाराम लांबर, अपर्णा सूरज शेडगे, पूजा मांडे, स्मिथ मांडे, स्वप्नील उमराटकर, वृषाली संतोष मोरे, सुचिता सुनील धोत्रे हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पाचाड वैद्यकीय अधिकारी सुरज कोंडुळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *