‘शाब्बास वहिनी २०२६’ कार्यक्रम उत्साहात; महिलांच्या कौशल्यांना व्यासपीठ

मुंबई : जागतिक महिला दिना निमित्त आयोजित ‘शाब्बास वहिनी २०२६’ हा भव्य कार्यक्रम जोगेश्वरी येथे उत्साहात पार पडला. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी उपस्थित राहून विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमांतर्गत पाककला, मेहंदी, बॉक्स क्रिकेट तसेच ‘मिसेस उत्तर-पश्चिम लोकसभा’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेल्या सर्व महिलांचे अभिनंदन करताना या कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल उपमहापौर संजय घाडी यांनी खासदार रविंद्र वायकर यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *