विरोधकांनी रडीचा डाव न खेळता मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी सुनावले

Spread the love

मुंबई- ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. विरोधकांनी आता रडीचा डाव खेळू नये.लोकशाहीत जय पराजय होत असतात. विरोधकांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, विरोधकांनी आता रडीचा डाव खेळताना दिसताहेत. कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळी ईव्हीएमवर संशय नव्हता. झारखंडला जिंकले तिथे हेच ईव्हीएम होते आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ईव्हीएमवरच झाल्या. मतदारांनी कौल दिल्यानंतर लोकशाहीत जय पराजय होत असतात, आपण मतदारांच्या कौलाचा सन्मान करण्याची गरज आहे. आरोप करणाऱ्यांनी, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनी आपापल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आपली भूमिका मांडावी. रडीचा डाव खेळू नका,मोठ्या मनाने पराभव स्वीकारा. लोकशाहीत जय पराजय होत असतात, असा टोलाही दरेकरांनी विरोधकांना लगावला.उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना दरेकर म्हणाले की, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुणी कुणाला संपवत नसतो, जो-तो आपल्या कर्माने-कृतीने संपत असतो. पक्षाला अपयश आले म्हणजे संपले असे काही नाही. त्यांनी मेहनत घेऊन पुन्हा पक्ष उभा करावा, राजकारणात यश अपयश येतच असते. आमच्या पक्षाने लोकसभेला महाराष्ट्रात अपयश पाहिलेय. आम्ही खचून न जाता काम केले, जनतेचा विश्वास संपादित केला. फक्त फेसबुक लाईव्ह केले म्हणजे जनता स्वीकारते असे नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, दुधाला अनुदान देण्याचे काम आमच्या सरकारने केले होते. जयंत पाटील, बंटी पाटीलचा दूध संघ आहे म्हणून राजकीय सुडाने कुठलीही कारवाई करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेय विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचना आम्ही स्वीकारू, सुडाने कुठल्याही प्रकारचे राजकारण होणार नाही. पण काही राजकीय नेते सुडाने वागले आणि त्याचा सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादकांना त्रास झाला तर त्याची योग्य ती दखल घेऊन सरकार कारवाई करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *