रायगड प्राधिकरण अंतर्गत केलेल्या करोडो रुपयांच्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चाळण! शासकीय अधिकारी वातानुकूलित कक्षात बसून परिणामी ठेकेदाराने केली मनमानी पद्धतीने कामे?
रायगड प्राधिकरण अंतर्गत केलेल्या करोडो रुपयांच्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चाळण! शासकीय अधिकारी वातानुकूलित कक्षात बसून परिणामी ठेकेदाराने केली मनमानी पद्धतीने कामे?
महाड( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या व परिसरातील विकासाच्या कामासाठी रायगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले याच रायगड प्राधिकरणा अंतर्गत मागील ५ वर्षापासून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची अक्षरशः चाळण झाली असून शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत त्यामुळे ठेकेदाराबरोबरच शाखा अभियंता सहित कार्यकारी अभियंता देखील मालामाल झाले असून वातानुकूलित कक्षात बसून कागदी घोडे नाचवण्याच्या कामामुळे ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम केल्याने शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फाटल्याचे चित्र रायगड परिसरातील रस्त्यांच्या कामावरून दिसत आहे
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड व परिसरातील २१ . गावातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले या प्राधिकरणाचे कार्यालय महाड येथे आहे मात्र याच कार्यालयात वर्षानुवर्षे एकात ठेकेदाराला मनमानी पद्धतीने कामे देण्याच्या उद्देशामुळे कामांचा दर्जा तर खालावला आहे परंतु शासनाचे करोडो रुपये पाण्यात जाण्याचे काम ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीमुळे झाल्या असून करोडो रुपयांच्या रस्त्यांच्या कामांची अक्षरक्षा चाळण झाली असल्याचे चित्र या रायगड प्राधिकरणातून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामावरून पाहण्यास मिळते
रायगड प्राधिकरणाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामांची नावे व अंदाजीत रक्कम पुढीलप्रमाणे:
१) होडगाव ताम्हणे कडापूर घरोशी रस्ता तयार करणे४५२. ८६ लक्ष रुपये
२) बिरवाडी मांघरुण वाघोली रस्ता तयार करणे १४४०.०६ लक्ष रुपये
३) नेवाळी वाडी ते खडकी रस्त्याचे मजबुटीकरण व डांबरीकरण करणे १०३.०४ लक्ष रुपये
४) खर्डी नगर भुवन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ११५.६२ लक्ष रुपये
५) वाघेरी येथे अंतर्गत रस्ता व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे १०६.४६ लक्ष रुपये
६) खडकी वाडी ते नेवाळी वाडी रस्ता घाट सुधारणा करणे ७५.०० लक्ष रुपये
७) बिरवाडी मांघरुण वाघेरी रस्ता तयार करणे १३९३.०० लक्ष रुपये
८) खर्डी रोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ८९.७६ लक्ष रुपये
९) वाघोली पोटलेवाडी नेवाळेवाडी रायगड रोपवे रस्त्याचे सर्वेक्षण करणे ५१.७८ लक्ष रुपये
१०) नगर भुवन ते खडकी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे १३८.९७ लक्ष रुपये
११) रायगड वाडी ते वाघेरी रस्त्याचे सर्वेक्षण करणे ४१.७० लक्ष रुपये
१२) वाघोली आदिवासी वाडी रस्ता तयार करणे ४२.७५ लक्ष रुपये
१३) मांघरुण अंतर्गत रस्ता तयार करणे १३१.९२ लक्ष रुपये
१४) राज्य मार्ग ९७ ते कोंजर जोड रस्त्याचे मजबुती करण डांबरीकरण करणे१०. ५२ लक्ष रुपये
१५) राज्य मार्ग ९७ ते कोंडरान जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५०.७८ लक्ष रुपये
१६) राज्य मार्ग ९७ ते शांदोशी जोड रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ७०.२० लक्ष रुपये
१७) सावरट करमर रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४८.१० लक्ष रुपये
१८) खलई रस्त्याचे मजबुरीकरण डांबरीकरण करणे ४१.२५ लक्ष रुपये
१९) बांधणीचा माळ ते आमडुशी धनगरवाडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ३६.१५ लक्ष रुपये
२०) राज्य मार्ग १०१ ते वारंगी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे २४.३६ लक्ष रुपये
२१) राज्य मार्ग १०१ ते पंदेरी दापोली रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ६२.७९ लक्ष रुपये
२२) रायगड वाडी ते टकमक वाडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ३९.५९ लक्ष रुपये
२३) रायगड वाडी धनगरवाडी व परडी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५७.७५ लक्ष रुपये
२४) हिरकणी वाडी ते रोपवे ते नेवाली रस्त्याचे मजबूती करण डांबरीकरण करणे ४६.३२ लक्ष रुपये
२५) पाने ते कडसरी लिंगाणा नवीन वसाहत रस्त्याचे बांधकाम करणे ८४.९६ लक्ष रुपये
रायगड प्राधिकरण अंतर्गत करण्यात आलेल्या रायगड परिसरातील रस्त्यांची कामे ज्या ठेकेदारांना दिली त्यांच्याकडे कोणताही पूर्व अनुभव नव्हता तसेच मूळ ठेकेदाराच्या नावावर उप ठेकेदारांनी कामे केल्याने कामांचे अक्षरक्ष वाटोळे झाले असून राज्य शासनाचा पैसा रायगडच्या पाण्यात वाहून गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही मात्र रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना देखील रायगड प्राधिकरणाच्या एकाही अधिकाऱ्याला याबाबत खंत वाटू नये याबद्दल स्थानिक पर्यटक नागरिकांकडून राज्य सरकारला याबाबत विचारणा केली जात आहे मात्र कारवाई कोणी व कोणावर करायचे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे