महाड( प्रतिनिधी) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील सावित्री खाडीवरील दासगाव बंदरात असणाऱ्या जेटीला खड्डे पडल्यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्या अगोदरच दासगाव जेटीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे वारंवार करून देखील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दुर्लक्षपणा केल्याने जीवित हानी झाल्यानंतर डोळे उघडणार का असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे
एकेकाळी सावित्री खाडीवर दासगाव बंदर ऐतिहासिक मानले जायचे वाहतुकीची साधने नसल्याने पूर्वी दासगाव बंदरातूनच मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे मात्र कालांतराने वाहतुकीची साधने वाढल्याने कालांतराने जलवाहतूक होण्याचे प्रमाण कमी झाले
महाड तालुक्यातील सावित्री खाडीवरील दासगाव बंदर हे आज ही ऐतिहासिक बंदर म्हणून नावारूपाला आहे मात्र या बंदरावर असणाऱ्या जेटीला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून चालत जाऊन जेटी वर असणाऱ्या होडी मध्ये बसण्यासाठी जात असताना खड्ड्यातून चालत जावे लागत असल्याने तोल जाऊन पाण्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
दासगाव बंदरातून सव, गोठे, रावढळ ,वामने, सापे, लोअर तुडील , तेलंगे या परिसरातील नागरिक व्यापारा निमित्त व दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचप्रमाणे विविध औषध उपचारांसाठी खाजगी डॉक्टर कडे वारंवार जात असतात त्यांना होडीतून प्रवास हा वेळेची बचत व कमी खर्चातील असल्याने ते होडी मार्गे दासगाव येथे जाणे पसंत करतात मात्र दासगाव येथील जेटीची झालेली दुरावस्था पाहता या जीटी वर पडलेले मोठमोठे खड्डे यामधून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते चुकून तोल जाऊन पाण्यात पडल्या जीवित हानी होण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तातडीने या जेटीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून व कोळी बांधवांकडून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे वारंवार होत असताना देखील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत