मुंबई : विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी मुंबईतील श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधीच्या वतीने श्री विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या यज्ञामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या यज्ञावेळी वैदिक मंत्रोच्चारात विधीवत पूजा, यज्ञ आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले. विश्वशांती, समाजकल्याण आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास मंदिर विश्वस्त चंद्रकांत संघवी, संजोग परब आणि राजीव चोकसी उपस्थित होते. तसेच नगरसेवक गौरंग झवेरी आणि आकाश पुरोहित यांनीही यज्ञात सहभागी होत दर्शन घेतले.
या धार्मिक उपक्रमामुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून समाजात शांतता, ऐक्य आणि सद्भावना वृद्धिंगत होण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.