मुंबई जिल्हा बँक निर्मित सहकार भवनाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा*

मुंबई – मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून विक्रोळी कन्नमवार नगर येथील मुंबई हौसिंग फेडरेशन लि. संचलित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा व सायन प्रतीक्षा नगर येथील सहकार भवनाचा भूमिपूजन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभ हस्ते सुविधा भूखंड क्र. ५, सी. एस क्र. ४ (भाग) व ५ (भाग), सॉल्ट पॅन विभाग, प्रतीक्षा नगर, सायन, येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रवीण दरेकर असणार आहेत.

या सोहळ्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, आ. तमील सेलवन, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, म्हाडा मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, झोपू प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक आ. प्रसाद लाड, आ. सुनिल राऊत, नंदकुमार काटकर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आणि निमंत्रक सिद्धार्थ कांबळे, नगरसेवक आणि मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *