‘माझी मुंबई’ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर; ८६ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि महापौरांच्या पुढाकारातून आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२६’ चा निकाल आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या हस्ते निकाल घोषित करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्षा सौ. राजेश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
१ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ८६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी ‘माझी मुंबई’ या विषयावर सर्जनशीलतेची झलक दाखवत विविध चित्रांमधून मुंबईचे वेगवेगळे पैलू उभे केले.
स्पर्धेतील पाचही गटांतील विजेत्यांना लवकरच रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक आणि पदक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *