महाडमध्ये तापमानाचा पारा ४५. डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढला

महाड (प्रतिनिधी)
महाड आणि परिसरात आता सूर्य आग ओकत असून गेली दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यासह दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे.
मार्च महिना सरत असताना आणि एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वी सूर्य आग ओकत आहे गेली काही दिवसांपासून तापमानामध्ये चढ उतार होत असतानाच बुधवारपासून या तापमानात अचानक वाढ झाली आहे तापमानाचा पारा अचानक चढल्यामुळे वातावरण चांगले तापले आहे सगळीकडे प्रचंड उष्मा जाणवत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे या वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेवर देखील परिणाम दिसून येत आहे मानवी आरोग्य या उन्हामुळे बिघडू लागले आहे यामुळे मळमळ उलटी डोकेदुखी अपचन असे आजार डोके वर काढत आहेत गेली दोन दिवसांपासून पारा चढल्यामुळे वातावरणामध्ये ४५डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे काही ठिकाणी पाऊस देखील पडत असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बदलत्या तापमानामुळे कृषी क्षेत्रावर देखील परिणाम दिसून येत आहे. यापूर्वीच आंबा पिक धोक्यात आले असून आता उर्वरित कडधान्य देखील या उन्हाळ्यामुळे हातातून निसटण्याची शक्यता आहे उन्हात बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून केले जात आहे भरपूर पाणी पिणे डोक्यावर टोपी तसेच चेहऱ्याभोवती स्कार्फ बांधूनच बाहेर पडणे योग्य ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *