बदलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)च्या वतीने बदलापूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर कार्यकारिणीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले,” या महात्मा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास शहराध्यक्ष अशोक गजरमल, प्रा. योगेश साळवे, स्वप्निल (भाऊ) शिर्के, सुभाष रणपिसे, शुभम भोसले तसेच बेलवली उत्कर्ष मित्र मंडळाचे सौरभ, विशाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.