‘टिपू सुलतान हे इतिहासातील जटिल व्यक्तिमत्व’; एस. जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान

Spread the love

देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टिपू सुलतान हे भारताच्या इतिहासातील अत्यंत जटिल व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले आहे. भारतावरील ब्रिटीश राजवटीला विरोध करणारी महत्तवाची व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. तसेच त्यांचा पराभव आणि मृत्यू भारतीय उपखंडासाठी भविष्यासाठी महत्त्वाचे वळण ठरले असेही एस. जयशंकर म्हणाले. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या वादग्रस्त मुद्द्यांवर देखील भाष्य केले.एस जयशंकर म्हणाले की, म्हैसूर भागात टिपू सुलतान यांच्या राजवटीचा नकारात्मक प्रभाव देखील दिसून आला. म्हैसूरच्या अनेक भागात आजही त्यांच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही. भारताच्या इतिहासात त्यांनी इंग्रजांना केलेल्या विरोधावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आणि त्यांच्या प्रशासनाच्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्व समाजात इतिहास गुंतागुंतीचा असतो. आजचे राजकारण अनेकदा निवडक वस्तुस्थितीमध्येच गुंतलेले असते. टिपू सुलतान प्रकरणात देखील असेच झाले आहे. एस जयशंकर हे विक्रम संपत यांनी लिहिलेल्या ‘टिपू सुलतान : द सागा ऑफ द म्हैसूर इंटररेग्नम १७६१-१७९९’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. “मागील १० वर्षात राजकीय परिस्थिती बदलल्याने पर्यायी दृष्टीकोन समोर आले आहेत. आता आपण वोट बँकचे कैदीही नाहीत आणि गैरसोयीचे ठरेल असे सत्य उघड करणे राजकीयदृष्ट्या चुकीचेही ठरत नाही”, असेही एस. जयशंकर यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी वस्तुस्थिती ही बऱ्याचदा शासनाच्या सोयीनुसार तयार केली जाते असंही नमूद केले. राजकीय क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून टिपू सुलतान यांच्यावरील या खंडात देण्यात आलेल्या माहितीने मी प्रभावित झालो असे मत त्यांनी पुस्तकाबद्दल बोलताना व्यक्त केले. एस. जयशंकर पुढे बोलाताना म्हणाले की, वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही शतकांमध्ये अनेक राजवटी आणि संस्थानांनी आपल्या विशेष हितसंबंधांसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सहभाग घेतला आणि काहींनी स्वातंत्र्यानंतरही हे सुरूच ठेवले. टिपू सुलतानच्या मिशनरी आणि फ्रेंच, इंग्रज समकक्ष यांच्यात झालेला संवाद खरोखर आकर्षक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *