कुर्ल्यातील नववर्ष यात्रेत झाला स्वदेशी चा जागर

कुर्ला (प.) नववर्ष यात्रेत यंदा “स्वदेशी आचार विचार प्रचार” ही संकल्पना होती या निमित्ताने स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देणे, स्वभाषा टिकवून ठेवणे आणि संवर्धन करणे, आपली पारंपरिक वेशभूषा सण उत्सवा मधून वापरणे, आपल्या भारतीय पारंपरिक भोजनाला प्राधान्य देणे, पारंपरिक भजन कीर्तन टिकवून ठेवणे, आपल्या घरातून भारतीय संस्कार जपणे आणि फिरायला जाताना भारतीय पर्यटन स्थळे आणि धार्मिक अध्यात्मिक स्थळांना प्रोत्साहन देणे या विषयांवर प्रबोधन करण्यात आले. भारत नाका येथे स्वदेशी संकल्पनेला धरून भव्य व आकर्षक देखावा उभारण्यात आला होता. यात्रेत विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा मध्ये लहान मुले आणि महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता सर्वेश्वर मंदिर,शिक्षक नगर, जय भवानी चौक, गौरीशंकर मंदिर या चार ठिकाण हुन यात्रांना सुरुवात झाली आणि भारत नाका येथे सर्व कुर्लेकरांनी एकत्र येऊन वंदे मातरम” या राष्ट्रगानाला150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सामूहिक वंदे मातरम चे गायन करून मानवंदना दिली. ढोल ताशांच्या गजरात, शिवकालीन शस्त्रकला, लहान मुलांचे मुलींचे लेझीम आणि पिरॅमिड अशा विविध प्रत्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. जागृत विनायक मंदिर येथे महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *