कंगना रणौतने एक्स बॉयफ्रेंडच्या मुलीला पहिल्याच चित्रपटात केलेलं रिप्लेस; झरीना वहाबचा मोठा खुलासा, म्हणाली…

Spread the love

अभिनेता आदित्य पंचोली व अभिनेत्री झरीना वहाब यांचा मुलगा सूरज पंचोलीने २०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांची मुलगी सना पंचोलीनेही २००० च्या दशकात चित्रपटांमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे सना २००५ मध्ये ‘शाकालाका बूम बूम’मधून पदार्पण करणार होती, परंतु तिची जागा कंगना राणौतने घेतली. त्याचदरम्यान सनाचे वडील आदित्य आणि कंगना यांचे अफेअर सुरू होते. कंगनाने नंतर आदित्यवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आणि मानहानीचा खटला दाखल केला. अलीकडेच एका मुलाखतीत सनाच्या आईला याबाबत विचारण्यात आलं. त्यावर सनाला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, असं ती म्हणाली.लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत झरीना सनाबद्दल म्हणाली, “अभिनय तिला कधीच जमणार नव्हता.” तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. “कुटुंबीय काही वेळा मुलांना ‘कर बेटा’ म्हणत भाग पाडतात; पण ती म्हणायची, ‘नाही आई, मला हे करायचं नाही’. ती स्लीव्हलेस टॉप किंवा शॉर्ट ड्रेस घालत नाही. तिला ‘लो नेक’ ड्रेस घालायला दिला होता, ती धावत परत आली आणि तिच्या खोलीतून बाहेरही आली नाही. मग त्यांनी दुसऱ्याला घेतलं, हे मुख्य कारण होतं. सना अजूनही असे कपडे घालत नाही,” असं झरीना म्हणाली. सनाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं आणि आम्ही याबाबत कधी गमतीतही बोलत नाही, असं तिने नमूद केलं. २०१३ मध्ये सना पांचोलीने हिंदुस्तान टाईम्सला एक मुलाखत दिली होती. तिथे तिने तिच्या आईने आता केलेल्या वक्तव्याच्या उलट सांगितलं सांगितलं. चित्रपट गमावल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही, असं तिने म्हटलं होतं. “शाकालाका बूम बूम संदर्भातील गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्या नाहीत. मात्र मला कसलाही पश्चाताप नाही”, असं ती म्हणाली होती. सनाने लॉस एंजेलिसमध्ये अभिनयाचा कोर्सही केला होता, पण तिला खऱ्या व वास्तविक वाटणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करायचे होते, असं तिने सांगितलं होतं. “मी एलएमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आहे, पण मला डान्स करायचा नाही. मी डान्स चांगला करते, पण मला अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये रस नाही. मला वास्तववादी चित्रपट करायचे आहेत. मला बऱ्याच ऑफर मिळाल्या आहेत, पण मी स्वतःला त्यात काम करताना पाहू शकत नाही,” असं सना म्हणाली होती.
दिग्दर्शकाने दिलेली प्रतिक्रिया
‘शाकालाका बूम बूम’चे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान काय घडलेलं, ते सांगितलं होतं. कंगना या भूमिकेसाठी जवळपास फायनल झाली होती, पण नंतर ती अचानक गायब झाली, त्यानंतर त्यांनी सनाला घेतलं. मात्र तिच्या बाबतीतही गोष्टी बिघडल्या. मग कंगना पुन्हा दुबईत भेटली आणि तिला घेतलं. “दुर्दैवाने, सनाच्या बाबतीत गोष्टी गोष्टी बिनसल्या. त्या भूमिकेसाठी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची आणि व्यक्तिरेखेची आवश्यकता होती. त्याच दरम्यान, अचानक कंगना दुबईत भेटली, तिथून तिला लगेच जोहान्सबर्गला नेलं, जेणेकरून ती चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकेल,” असं ते म्हणाले होते. ‘शाकालाका बूम बूम’मध्ये बॉबी देओल, उपेन पटेल आणि सेलिना जेटली यांच्याही भूमिका होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *