विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आर. पी. आय (आर. के) चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात तसेच बदलापूर शहर अध्यक्ष अशोक गजरमल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आर. पी. आय (आर के) पक्षाचे जनसंपर्क कार्यालय बदलापूर पश्चिम येथे बदलापूर शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्य यांची बैठक दिनांक २७.१०.२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आरपीआय (आर. के) पक्षाची ध्येयधोरणे तसेच पक्ष वाढीसाठी करण्यात येणारी उपाययोजना यासंबंधी स्थानिक पातळीवर साधक बाधक चर्चा करण्यात आली तसेच पक्षाध्यक्ष राजाराम खरात साहेब व शहर अध्यक्ष मा अशोक गजरमल साहेब यांनी आरपीआय आर के पक्षाचे पदाधिकारी व सर्व सदस्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन केले सदर बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. त्या सर्वांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती. सदर बैठकीस सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.