आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल

आयपीएल २०२५ चा महालिलावात कोणत्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत. येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे. आयपीएल काऊन्सिलने लिलावापूर्वी ५७४ खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात ३६६ भारतीय आणि २०८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रिटेंशन यादी जाहीर केल्यानंतर फक्त २०४ स्लॉट शिल्लक आहेत. पंजाब किंग्जकडे सर्वाधिक ११०.५० कोटी रुपये आहेत, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी ४१ कोटी रुपये आहेत. आयपीएल लिलाव किती वाजता आणि कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया. आयपीएलचा लिलाव सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार आहे. यावेळी खेळाडूंच्या मूळ किंमती ३० लाख रुपयांपासून सुरू होईल, जी गेल्या वेळेपेक्षा १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर मूळ किंमती ४० लाख, ५० लाख, ७५ लाख, १ कोटी, १.२५ कोटी, १.५० कोटी आणि २ कोटी रुपये आहेत. या लिलावासाठी एकूण ७९ सेट तयार करण्यात आले आहेत. मार्की खेळाडूंच्या दोन सेटसह सुरुवात होईल, प्रत्येक सेटमध्ये ६ खेळाडू असतील, ज्यात गेल्या हंगामातील कर्णधार केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचाही समावेश आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आयपीएल २०२५ चा लिलाव किती वाजता सुरू होईल? जेद्दाहमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारी १२.३० वाजता आयपीएल मेगा लिलाव सुरू होईल. भारत आणि सौदी अरेबियामध्ये २ तास ३० मिनिटांचा फरक आहे. म्हणजे भारतात हा आयपीएल लिलाव दुपारी ३ वाजता सुरू होईल. बॉर्ड गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना सकाळी ७.५० वाजता सुरू होणार आहे. आयपीएल लिलाव सुरू होईपर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या दिवसाचा खेळ संपलेला असू शकतो.

आयपीएल २०२५ महालिलाव लाईव्ह कुठे पाहता येणार?

आयपीएल लिलावामध्ये भारताचे सर्वाधिक ३६६ खेळाडू आहेत. ज्यामध्ये ४८ कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. तर २०८ विदेशी खेळाडू आहेत, त्यामध्ये १९३ कॅप्ड खेळाडू आणि १२ सहयोगी देशाचे खेळाडू आहेत. हा आयपीएल लिलाव टीव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स १८ वर आणि मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *