अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा

Spread the love

अर्चना पूरन सिंगने १९७९ मध्ये ‘लडाई’ या चित्रपटात पहिल्यांदा दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यानंतर आता तब्बल ३५ वर्षांनंतर या दोघींनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये स्टेज शेअर केला. अर्चना पूरण सिंगने तिच्या इन्स्टाग्रामग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात स्वप्ने कशी पूर्ण होतात आणि तिने रेखा यांना मिस्ट्री मॅनबद्दल विचारलं होतं, त्यासंदर्भात सांगितलं आहे.अर्चनाने कपिल शर्मा शोच्या सेटवर रेखा यांच्याबरोबर काढलेले काही फोटो शेअर केले आहेत. तसेच लहानपणीची आठवण सांगितली. “जेव्हा मी रेखाजींचा ‘सावन भादों’ चित्रपट पाहिला, तेव्हा मी एका लहानशा गावात राहणारी एक मुलगी होते. जी कधी मुंबईला येईल किंवा रेखाजींना वैयक्तिकरित्या भेटेले, अशी आशाही नव्हती.” शेवटी तो दिवस आला जेव्हा अर्चनाला तिच्या आवडत्या आयकॉनबरोबर काम करण्याची संधी मिळाली. “अनेक वर्षांनंतर मी त्यांच्याबरोबर ‘लडाई’मध्ये काम केलं. तिथे त्यांनी मला त्यांच्या मेकअप रूममध्ये बोलावलं आणि मला मेकअपबद्दल सांगितलं. तसेच पापण्या (आय लॅशेस) कशा घालायच्या याबद्दल सल्ला दिला, हा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरू केल्याचं श्रेय रेखा यांना दिलं जातं,” असं अर्चनाने लिहिलं.
अर्चनाने रेखा यांना ‘त्या’च्याबद्दल विचारलं अन्…
रेखा यांच्यबरोबरच्या बॉन्डबद्दल बोलताना अर्चना म्हणाली, “फिल्मसिटीतील लॉनमध्ये गप्पा मारल्याच्या आमच्या आठवणी माझ्याकडे आहेत. तसेच मी त्यांना विचारलं होतं की ‘तो’ कोण आहे, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की तो कोण आहे हे तुला माहीत नाही का?” अर्चनाने रेखा यांचं कौतुक केलं. त्यांना प्रत्येकवेळा भेटणं, त्यांच्याबद्दल जाणून घेणं खूप आनंददायी असतं. लहान खेडेगावातील मुलांची स्वप्नेही पूर्ण होतात, असं अर्चनाने लिहिलंय. रेखा या वीकेंडला नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणार आहे. शोच्या निर्मात्यांनी शनिवारी एक टीझर शेअर केला, ज्यामध्ये या भागाची झलक पाहायला मिळतेय. या व्हिडीओत रेखा अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत असलेल्या कृष्णा अभिषेकबरोबर नाचताना दिसतात. हा एपिसोड प्रेक्षकांना ८ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *