“अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!

Spread the love

राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पवार हे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज विशेष अधिवेशनात पहिल्यांदाच विधानभवनात भाषण केलं. यावेळी त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. सर्वांत तरुण आमदार असल्याने सर्वांत तरुण अध्यक्षाने माझ्याकडे विशेष लक्ष द्यावं, अशीही मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.“आज या देशाचं वेगळेपण टीकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या.. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली ज्यामुळे संबंध जगामध्ये आपलं देश वेगळेपण टिकवून ठेवू शकलं. त्याचं दुसरं कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावं याचं कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल”, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले, “संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आला आहे. “अमृताहून गोड तुझे नाम देवा”, आता संतांच्या वाणीतूनसुद्धा आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलंय. पुढच्या काळात काम करत असातना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो.” असं म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनीही मिश्किल हास्य केलं. त्यावर रोहित पाटील पुढे म्हणाले, “अमृताहूनी मुद्दाम म्हणालो. पुराणांमध्ये अमृताला वेगळं महत्त्व आहे. आजही आहे. फडणवीस मी विनंती करेन की विरोधी पक्षालाही सहकार्य कराल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *