मुंबई ( प्रमोद देठे) –
जागतिक पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि जनकल्याणासाठी मुंबईतील श्री मुंबादेवी मंदिर येथे विशेष श्री विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईस्थित श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधीच्या वतीने शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मंदिर परिसरात हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम पार पडणार आहे. सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने या यागाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.
या विशेष कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रार्थना व यज्ञामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी श्री हेमंत पुरुषोत्तम जाधव
प्रशासक, श्री मुंबादेवी मंदिर मंदिर,
मो. ९८२०४२८२८० / ९८२०१२८२८० संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.