मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात निरीक्षकांच्या बदल्या; सागर इंगोले पेल्हारला, प्रफुल्ल वाघ वाहतूक शाखेत

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत दोन पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. जारी आदेशानुसार, वादग्रस्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेले वाहतूक शाखा-१ (मिरा-भाईंदर) येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांची बदली पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर आचोळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांची बदली प्रभारी पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा-१ (मिरा-भाईंदर) येथे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार पोलीस आयुक्त स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे आदेश पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनंतर ही बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *