मतदार यादी पुनरावलोकनासाठी ४ एप्रिलला SIR मॅपिंग कॅम्प; नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे – अनिल ताटे(भाजपा मंडळ अध्यक्ष)

काशिमीरा : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) अंतर्गत मतदार यादी पडताळणीसाठी ४ एप्रिल २०२६ रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सेंट झेवियर शाळेजवळील कम्युनिटी हॉल येथे होणार असल्याची माहिती भाजप काशिमीरा मंडल अध्यक्ष अनिल ताटे यांनी दिली. या कॅम्पमध्ये मतदार यादीतील नाव पडताळणी, नवीन नोंदणी, दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील प्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली मतदार नोंदणी अचूक करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कॅम्पला उपस्थित राहताना नागरिकांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) आणि पासपोर्ट साईज फोटो ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असेही सांगण्यात आले आहे. विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते. या प्रक्रियेत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन पडताळणी करतात, मतदारांच्या कागदपत्रांची तपासणी करतात तसेच अपात्र नावे वगळून पात्र नागरिकांचा समावेश करण्यात येतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनभाजपा काशीमिरा मंडळ अध्यक्ष अनिल ताटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *